एकनाथ शिंदेंची लोकबिरादरी प्रकल्पाला सदिच्छा भेट; कार्याची घेतली माहिती

Eknath Shinde

गडचिरोली : सततच्या पावसामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गडचिरोली (Gadchiroli news) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, शिंदे यांनी मंगळवारी हेमलकसा या अतिदुर्गम भागातील लोकबिरादरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.

बाबा आमटे यांच्या प्रेरणेने प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांनी अपार मेहनतीने उभ्या केलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्येक अंगाची माहिती यावेळी शिंदे यांनी प्रकाश आमटे यांच्याकडून जाणून घेतली. इतक्या दुर्गम भागात तीन ऑपरेशन थिएटरसह सुसज्ज रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, कृषी संशोधन, वन्यजीव मदत केंद्र आदी अनेक प्रकारच्या कार्यातून आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आमटे परिवार आणि त्यांचे सहकारी करत असलेल्या अद्वितीय कार्याबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच, राज्य शासन सदैव आपल्यासोबत असल्याची ग्वाही दिली.

वन्यजीवांचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी प्रकाश आमटे यांनी उभ्या केलेल्या रेस्क्यू सेंटरची माहितीही शिंदे यांनी यावेळी घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER