
मुंबई : कुंभार समाजाचा (Kumbhar samaj) संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे. परंतु, प्लास्टर ऑफ पॅरिसवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे कुंभार समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. कुंभार समाजाला गणेश मूर्ती करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसशिवाय पर्याय नाही. यासह गेल्या दोन वर्षात महापूर आणि कोरोनामुळे कुंभार बांधवांवर कर्जाचा डोंगर झाला आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसवर घालण्यात आलेली बंदी शासनाने उठवावी आणि कुंभार समाजास न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कुंभार समाजाच्या शिष्ठमंडळाने शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेवून सादर केले.
याप्रसंगी झालेल्या बैठकीत शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांच्या भावना गणेशोत्सवाशी जोडल्या असून कुंभार समाजावर अन्याय होवू देणार नाही, प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी हटविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत लवकरच राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्याची ग्वाही नगरविकास मंत्री शिंदे यांनी कुंभार समाजाच्या शिष्ठमंडळास दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला