एकनाथ खडसेंचा खुलासा : पक्षांतर नाहीच, व्हायरल क्लिपकडे दुर्लक्ष करा !

Eknath Khadse

मुंबई : भाजपाचे (BJP) वरिष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पक्षात राहून पक्षातील नेत्यांवर आरोप करत राहात असतात. त्यांच्या काही विधानांमुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पेव फुटते. मग कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादीत (NCP) खडसे जाणार अशी चर्चा रंगू लागते. आज दिवसभर एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. त्याला कारणही तसेच होते.

एकनाथ खडसेंची एक ऑडिओ  क्लिप व्हायरल झाली. त्यात ‘आपण महिनाभरात भाजप सोडणार असून, दुसर्‍या पक्षात काय पद मिळतं, केवळ याची प्रतीक्षा आहे. ’ असा संवाद खडसेंनी कार्यकर्त्यांसोबत केलेला  ऐकू येतोय. मात्र, खडसेंनी आता यू-टर्न घेतला आहे. या क्लिपकडे लक्ष देऊ नका असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.

पक्षांतराचा इन्कार केला आहे. तो कॉल चुकीचा असल्यानं ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचा खुलासा खडसेंनी केलाय. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी पक्षातील काही मंडळींमुळे आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून खडसे हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER