जमीन खरेदीप्रकरणात खडसेंना राजीनामा द्यावा लागला; फडणवीसांचा पलटवार

Eknath Khadse - Devendra Fadnavis

नवी दिल्ली : भाजपाचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) गेल्या काही दिवसांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अनेक आरोप करताना दिसून येत आहेत. त्यावर आता फडणवीसांनी खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसेंना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर एमआयडीसी जमीन खरेदीप्रकरणात राजीनामा द्यावा लागला.

त्यांच्यावर गुन्हा माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने  दाखल झाला, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा खडसेंवर पलटवार केला. देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, कंगना रणौत अशा विविध विषयांवर भाष्य केलं. एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत; पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही, त्यांना MIDC प्रकरणात राजीनामा द्यावा लागला.

मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लीन चिट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनामा द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला.

त्यांच्या काही तक्रारी असतील तर घरातल्या घरात चर्चा करून त्या दूर करू असं सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे, अशी माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER