शुक्रवारी हजारो कार्यकर्त्यांसह एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीची अधिकृत घोषणा

Sharad Pawar - Eknath Khadse

मुंबई : भाजपाचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) प्रवेशाबद्दलची चर्चा अखेर खरी ठरली आहे. काही वेळेपूर्वीच खडसेंनी भाजपचा राजीनामा दिला असून, येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आताच दिली आहे.

याबाबत माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांनी स्वतः फोन करून भाजपचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार येत्या शुक्रवारी त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारीही असू शकतात. त्यांनाही पक्षात घेतले जाईल. येणाऱ्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात असलेले उत्तर महाराष्ट्रातील बडे नेतेही पक्षप्रवेश करू शकतील. त्यांचेही आम्ही स्वागत करू, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER