रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह

Rohini Khadse

जळगाव : काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले भाजपाचे माजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. रोहिणी खडसे यांनी स्वतः ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. ‘माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे, सावधता म्हणून रुग्णालयात दाखल होत आहे.

‘ असे ट्विट रोहिणी यांनी केले आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत दणक्यात त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश पार पडला.

यावेळी त्यांची कन्या रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल झाल्या. एकनाथ खडसेंवर झालेल्या अन्यायामुळे आम्हाला कुटुंब म्हणून त्रास झाला, असे सांगताना आता यापुढच्या काळात राष्ट्रवादीचे मोठे काम आम्ही उभे करू, असा निर्धार रोहिणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER