एकनाथ खडसेंचा दावा : १० आमदार माझ्या संपर्कात; भाजपमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार?

Eknath Khadse

जळगाव : माझ्यासोबत उद्या भाजपचे (BJP) १५-१६ माजी आमदार राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असून भाजपमधील १०-१२ आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे . त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी या तिघांकडून मला ऑफर होत्या; पण राष्ट्रवादीत या ठिकाणी विस्ताराला वाव आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला, असेही खडसे म्हणाले. अलीकडच्या काळात माझ्यासोबत व्यक्तिगत घटना घडल्या.  या घटना वेदनादायी होत्या.  माझ्या अनेक चौकशा केल्या, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.  या सर्वांचा मला प्रचंड मनस्ताप झाला. भाजप स्थापन झाल्यापासून पक्षाचं काम एकनिष्ठेनं  आणि प्रामाणिकपणे केलं, त्या कालखंडात परिस्थिती फार अवघड होती.

आणीबाणीनंतर भारतीय जनता पार्टीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ती जनमानसात रुजलेली नव्हती. कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी नव्हते. त्यावेळी गावागावांत उपेक्षा सहन करावी लागायची. पण सर्वांच्या मेहनतीने भाजपला आज अच्छे दिवस आले. त्याचा मला नेहमी आनंद राहिला आहे, असेही खडसे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER