एकनाथ खडसेंचा धमाका; मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव

Eknath Khadse-Raksha Khadse

जळगाव: राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली आहे. एकूण २ लाख, १४ हजार उमेदवारांचे भवितव्य आजच्या मतमोजणीमध्ये ठरणार आहे. या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती आले असून काही ठिकाणाचे निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पुरता धुव्वा उडाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींपैकी नऊ गावांमध्ये महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे. तर इतर गावांमध्येही महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनल्सची जोरदार घौडदौड सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER