भाजपला नुकसान पोहोचेल असा निर्णय नाथाभाऊ घेणार नाहीत : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil AND Eknath Khadse.jpg

कोल्हापूर : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबद्दल अनेक वेळा ते पक्ष सोडणार असल्याच्या अफवा उठल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टीला नुकसान पोहचेल असा कोणताही निर्णय नाथाभाऊ खडसे घेणार नाहीत, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या नावाची जोरदार चर्चा राज्यात सुरू झाली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची खलबत देखील सुरू झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागलेले भाजपचे मोठे नेते हे एकनाथ खडसे आहेत का अशी जोरदार चर्चा सुरू झाली. यावर बोलताना आ. पाटील म्हणाले, एकनाथ खडसे हे आमचे जुने-जाणते आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ज्यामुळे पक्षाला नुकसान पोहचेल असा कोणताही निर्णय नाथाभाऊ घेणार नाहीत. उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. मात्र चंद्रकांत पाटलांनी नाथाभाऊ पक्ष सोडणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. मग नाथाभाऊ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले नसतील तर मग भाजपचा आणखी कुठला मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहे हा प्रश्न राजकीय वर्तुळात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER