एकनाथ खडसे भाजप सोडणार का? पंकजा मुंडेंनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया

Pankaja Munde- Eknath Khadse

मुंबई : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादीच्या (NCP) वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी पहिल्यांदाच खडसे यांच्या भाजप सोडण्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली .

एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

राज्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने संवेदनशीलपणे निर्णय घेऊन मदत करायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी आरक्षणाला धक्का नको असंही त्यांनी स्पष्ट केलं. ऊसतोड कामगारांच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याही घोषणाही पंकजा मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान विधानसभेतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे याही नाराज होत्या. त्यांनी ती नाराजी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. खडसे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्रितपणेही काही जाहीर कार्यक्रमांमधून आपल्या मनातली खदखदही बोलून दाखवली होती. पंकजा मुंडे यांची नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याचं म्हटले जाते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER