एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर; ठाकरे सरकारमधील मंत्र्याकडून सूचक विधान

Gulabrao patil - Eknath Khadse

जळगाव : मागील काही दिवसांपासून भाजपचे (BJP) माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पक्षांतराची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shiv Sena) प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगावात खडसेंच्या पक्षांतराबाबत सूचक विधान केले. ‘सध्या एकनाथ खडसे कोणत्या पक्षाशी संपर्कात आहेत, याची मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे खडसे राष्ट्रवादीत (NCP) जाणार की शिवसेनेत जाणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मुंबईत खडसेंची शरद पवारांसोबत (Sharad Pawar) भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत ४ दिवस मुक्कामी असताना खडसे आणि शरद पवार यांच्यात कोणत्याही प्रकारची भेट झाली नाही. मध्यंतरी खडसेंनी शिवसेनेत यावे, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांकडून घातला जात होता. त्यात मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत (Uday Samant) यांच्यासह स्वतः गुलाबराव पाटील यांनी खडसेंना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. मात्र, खडसेंनी याबाबत कोणतेही मत मांडले नव्हते. त्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

मात्र, मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज गुलाबराव पाटील यांनी दिलेली सूचक प्रतिक्रिया खडसेशिवसेनेच्या वाटेरवर तर नाहीत ना? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER