एकनाथ खडसे 22 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार? फडणवीस म्हणाले…

Fadnavis-Khadse

उस्मानाबाद :- गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. एवढेच नाही आता तर 22 ऑक्टोबर रोजी खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी तारीख देखील सांगितली जात आहे. यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे वृत्त फेटाळले आहे.

देवेंद्र फडणवीस हे उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे. यावेळी पत्रकारांनी एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे का, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘असे मुहूर्त रोज सांगितले जात असतात. मी त्यावर बोलणार नाही’.

तर, दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. एवढंच नाहीतर खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करून दुसरा धक्का देणार आहे.

याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शक्यता नाकारली होती. आणि ते योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे’ असं फडणवीस म्हणाले होते.

मात्र, दुसरीकडे आता एकनाथ खडसे हे पुढील दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER