काही वेळातच एकनाथ खडसेंकडून राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा, शक्रवारी प्रवेश

Eknath Khadse

मुंबई : भाजपचे (BJP) नाराज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादी (NCP) प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. नाथाभाऊ समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता आहे. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे पत्रकार परिषद घेत आहेत, असे वृत्त ‘टीव्ही 9 मराठी ने दिले आहे.

एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याआधी ते भाजपचा राजीनामा देऊन सर्व पदे सोडणार आहेत.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यानंतर आता त्यांनी राजकीय सीमोल्लंघनासाठी नवी वेळ निश्चित केली आहे. त्यानुसार एकनाथ खडसे (Eknath Khadse) येत्या शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती ‘टीव्ही 9 मराठी’ला सूत्रांनी दिली आहे. खडसे यांच्या गोटात त्यादृष्टीने हालचालाही सुरु झाल्या आहेत. त्यासाठी खडसे समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER