एकनाथ खडसेंना कोर्टात खेचणार – अंजली दमानिया

Eknath Khadse - Anjali Damania

मी एकनाथ खडसेंना कोर्टात खेचणार अशी माहिती ट्विट करून सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी दिली.

आता खैर नाही न्यायालयात खेचणार, असे एका ओळीचे ट्विट करून अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना इशारा दिला. त्याआधीही त्यांनी एक ट्विट केले. त्यात जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असे म्हटले आहे.

आज एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी नाव न घेता अंजली दमानिया यांच्यावर टीका केली. म्हणाले – मी भाजपासाठी (BJP) चाळीस वर्षे दिली. या चाळीस वर्षांच्या बदल्यात मला काय मिळालं? एसीबीची (CBI) चौकशी, भूखंड घोटाळ्याचे आरोप, विनयभंगाचे आरोप, बाई दिली नाही; मागे लावली.

एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याची अंजली दमानियांनी गंभीर दखल घेत एकनाथ खडसेंना कोर्टात खेचणार असल्याचे म्हटले.

‘बाई दिली नाही; मागे लावली’ हे उद्गार एकनाथ खडसेंनी काढले. किती किळसवाणा माणूस आहे हा. हे उद्गार एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसमोर काढले. एकालाही शरम वाटली नाही की सुसंस्कृती स्त्रीबद्दल हा माणूस काय बोलतो आहे? असा टोमणा अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मारला.

एकनाथ खडसे हे धादांत खोटं बोलत आहेत असाही दावा अंजली दमानिया यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता. एकनाथ खडसे हे खुनशी प्रवत्तीचे आहेत असाही आरोप त्यांनी केला. मी भाजपाचे नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. पण एकनाथ खडसे यांनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीही केला नाही असे त्या कालच म्हणाल्या होत्या.

एकनाथ खडसे यांनी त्यांच्या वाढदिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केले. वाट्टेल ते बोलले, त्यामुळे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा प्रकाराचे वक्तव्य शोभणारे नाही, असे त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER