एकनाथ खडसे ‘घड्याळाची वेळ’ साधणार ; 10-10 च्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत करणार प्रवेश?

Eknath Khadse - Sharad Pawar

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भाजपवर (BJP) नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आज राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत . एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले . इतकेच नाही तर खडसे ‘घड्याळाची वेळ’ साधत 10-10 च्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे .

काही दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बातमी समोर आली होती. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चाही झाल्याचं म्हटलं जात होता. हा बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याची चर्चा रंगली होती.

शरद पवार यांच्या नेतृत्त्वात जळगावमधील स्थानिक नेत्यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे देखील उपस्थित होते. त्यात खडसेंच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार होता. परंतु राष्ट्रवादीने यासंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER