राष्ट्रवादीची ताकद दाखवण्यास सुरुवात; भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी

जळगाव :- भाजपमधून (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीची ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

जळगाव भाजपने काल बोलावलेल्या पक्षबांधणीच्या बैठकीपेक्षा, खडसेंना शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी जास्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं. एकनाथ खडसे यांच्या घरी कार्यकर्त्यांची रेलचेल होती. ही कार्यकर्त्यांची संख्या भाजपच्या पक्षबांधणीसाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा, जास्त होती असा दावा खडसे समर्थकांकडून करण्यात येत आहे.

जळगावातील मुक्ताईनगर या खडसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाची पक्षबांधणीसाठी बैठक झाली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर भाजपाची ही पहिलीच पक्षबांधणीची बैठक होती.

मुक्ताईनगर बैठकीत प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, खासदार रक्षा खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ सुरेश भोळे, अशोक कांडेलकर, डॉक्टर राजेंद्र फडके, यांची या बैठकीला उपस्थिती होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER