नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत गेल्यावर तरी खरं बोलावं : चंद्रकांत पाटील

मुंबई :- राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) त्यांना प्रत्युत्तर दिले .

नाथाभाऊ आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलावं. दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो, असं सांगतानाच आम्हाला फसवलं गेलं याचं आम्हाला दु:खं आहे. आमच्याशी धोका झाला. पण भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही, असं पाटील म्हणाले. भाजपमध्ये मतभेद नाहीत आणि असतील तरी ते सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असं सांगतानाच आमच्यामध्ये पक्ष सोडल्यावर मारण्याची पद्धत नाही. जोही पक्ष सोडून जाईल तो आहे तिथे सुखी रहा, अशी आमची पद्धत आहे, असेही पाटील म्हणाले.

पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही टोला लगावला. संजय राऊतांच नाव घेऊन माझा दिवस का बिघडवता? असा सवाल करतानाच राऊतांनी 80 जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी 80 नव्हे 280 जागा लढवाव्यात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही पाटील म्हणाले.

ही बातमी पण वाचा : नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलले की, लोक चंपा म्हणतात : राष्ट्रवादीच्या नेत्याची चंद्रकांतदादांवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button