हम करे सो कायदा होता म्हणून भाजपचा पराभव – एकनाथ खडसे

Eknath Khadse

जळगाव :- ‘विधान परिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव हा फाजिल नेतृत्वामुळे झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही अहंकाराची भावना अद्यापही गेली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मिळालेल्या यशानंतर खडसे बोलत होते.

या वेळी ते म्हणाले की, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचपैकी एकाही जागेवर भाजपला वर्चस्व मिळवता आलं नाही. अहंपणाचा पराभव झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ही भावना अद्याप गेली नाही. पुणे आणि नागपूरसारखा परंपरागत मतदारसंघ भाजपच्या हातातून निसटला. लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढला आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी टीव्ही-९ मराठी’शी बोलताना दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) नेहमी म्हणतात, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही, आम्ही हिमालयात जाऊन बसू, यांच्या नुसत्या गप्पा असतात. महाविकास आघाडीच्या एकीचे हे प्रदर्शन झाले आहे. भाजपचे नेतृत्व कमी झाले आहे. पक्षात हम करे सो कायदा होता, म्हणून हा पराभव झाला, असा घणाघातही खडसेंनी केला.

ही बातमी पण वाचा : पंजाबने करुन दाखवले, आता ‘हम करे सो कायदा’ चालणार नाही’, शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER