बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असं नुसतं म्हटलं, तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला

Eknath Khadse.jpg

मुंबई : एकनाथ खडसे यांनी आपल्यामागे केव्हा आणि कसा चौकशीचा ससेमीरा लागला याबद्दल आता सांगितले आहे.

ते म्हणाले, “भाजपला शेटजी भटजींचा पक्ष म्हटलं जात होतं. मारवाडी भटांचा पक्ष अशी या पक्षाची ओळख होती. मात्र, ही ओळख पुसण्यासाठी आम्ही गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगें, पांडुरंग फुंडकर यासारख्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करुन ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केला.

तेव्हापासून या पक्षाचा बहुजन चेहरा करण्याचा प्रयत्न केला. पक्षाला सर्वसमावेशक बनवण्यासाठी प्रयत्न केलेत.
परंतु, 2014 नंतर मात्र, मी बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असं नुसतं म्हटलं होतं. तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला. मी चार वर्षे त्या ओझ्याखालीच होतो. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालंय हे मान्यच करावं लागेल, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ ,ोडली व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. गेले चार वर्षांपासून ते भाजपवरची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवत होते. अखेर काल त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आतापर्यंत जाकली मूठ सवा लाखाची या म्हणीप्रमाणे त्यांनी जे झाकून ठेवून पक्षाप्रती निष्ठा बाळगली. आता मात्र, खडसेंचा बांध फुटला असे दिसत आहेत. एक एक करून सगळे गुपितं आता ते उघड करतील असे दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER