‘’उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार”; महाराष्ट्र बचाव आंदोलनात खडसेंची भूमिका

Eknath Khadse

जळगाव : राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याच्या कारणावरून भाजपाने ठाकरे सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारले आहे. सरकारविरोधात भाजपाने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असं म्हणत महाराष्ट्र बचावचा नारा दिला आहे. भाजपचे नेते राज्यभरात आपआपल्या घराच्या अंगणात, कार्यालयाबाहेर काळ्या फिती बांधून, ठाकरे सरकारविरोधातील घोषणांचे फलक हातात घेऊन आंदोलन करत आहेत.या आंदोलनात भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसेही सहभागी झाले आहेत.

ही बातमी पण वाचा:- भाजपकडून खडसेंच्या पुनर्वसनाचे प्रयत्न, केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

एकनाथ खडसे यांनीही मुक्ताईनगरातील कोथळी गावातील घरासमोर आंदोलन केलं. मुलगी रक्षा खडसे, मोजके कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. ‘उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार, महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, पण उद्धव सरकार मात्र आपल्या घरात, कोरोना रोखण्यात पूर्ण निष्फळ उद्धव सरकारचा धिक्कार, कोरोनाचे संकट होतंय फारच गडद, गोरगरिबाला सोडले वाऱ्यावर, असे काही फलक घेऊन खडसे यांनी घराच्या अंगणात आंदोलन करून सदैव पक्षाच्या सोबत असल्याची भूमिका जाहीर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला