… कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही – एकनाथ खडसे

Eknath Khadse

मुंबई : मी चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचे मागून खंजीर खुपसायचा हे कधीही केले नाही, असे म्हणून खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करताना स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

खडसे यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीवर टीका करताना ते म्हणाले की, मी ४० वर्षे भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात पक्षाने मला काय दिले ? मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तोंडावर गोड बोलायचे आणि पाठीमागे कारवाया करत रहायच्या हे मी कधी केले नाही, असे म्हणत त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

खडसे यांच्यावर भूखंड खरेदीत भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप होता. त्याचा राग व्यक्त करताना खडसे म्हणालेत, माझ्या मागे भूखंडाची चौकशी लावण्यात आली. काही दिवस जाऊ द्या कुणी किती भूखंड घेतले आहेत ते मी दाखवून देईन. नियमाच्या बाहेर जे वागले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.

भाजपा मला काही देणार नाही हे माहीत होते, असे म्हणून राष्ट्रवादीत जाण्याचे समर्थन करताना खडसे म्हणालेत – मी राष्ट्रवादीत जाणार तर बोंबाबोंब झाली. तुम्ही सकाळी पाच वाजता शपथ घेतली तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी पक्षच चांगला वाटला ना? पहाटे पाचला जसा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगला वाटला होता त्यापेक्षा मला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटतो आहे, म्हणून मी आलो राष्ट्रवादीत गेलो, असे म्हणत पहाटेच्या शपथविधीबाबत त्यांनी टोमणा मारला. आज राष्ट्रवादीत आल्याने डोक्यावरचे ओझे हलके झाल्यासारखं वाटते आहे असे खडसे म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER