एकनाथ खडसेंच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीची पकड घट्ट; ‘असा’ लागेल भाजपच्या गडाला सुरुंग

Sharad Pawar - Eknath Khadse

मुंबई :- जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकनाथ खडसेंचेच (Eknath Khadse) वर्चस्व आहे. जिल्ह्यात गेल्या किमान २५ वर्षांपासून खडसेंचे वर्चस्व आहे. एकनाथ खडसे हे सहा  वेळा भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांच्या पक्षांतरामुळे भाजपला (BJP) मोठा धक्का बसणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला मात्र बळ मिळणार आहे.

जळगाव महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र, अनेक नगरसेवक खडसेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेत सत्तांतर होऊ शकतं. ग्रामीण भागात सावदा, यावल, भुसावळ नगरपालिकांमध्येही सत्ताबदल होऊ शकतो.

खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेशानं अनेक आजी-माजी नेते त्यांचे समर्थक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा एक अंदाज बांधला जात असल्याने जळगाव महापालिकेवर असणारी भाजपची (BJP) एक हाथी सत्ता जाण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिकेत भाजप – ५७, शिवसेना (Shiv Sena)- १५ तर एमआयएम- ३ असे पक्षीय बलाबल आहे.

तसेच जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा मिळवत भाजपने पुन्हा जिल्ह्यातील वर्चस्व सिद्ध केलं आहे. जिल्हा परिषदेतील एकूण ६७ जागांपैकी भाजप-३३, शिवसेना-१४, राष्ट्रवादी-१६ तर काँग्रेसने ४ जागांवर विजयी मिळवला आहे. एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व चारही जागांसह बोदवड तालुक्यातील दोन्ही जागांवर भाजपने यश मिळवले आहे. पण आता खडसेंच्या जाण्यामुळे अडचणीत वाढ होणार आहे.

ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसेंच्या दावा 10 आमदार माझ्या संपर्कात ; भाजपमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER