राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना विधानपरिषदेवर पाठवणार?

Eknath Khadse - Sharad Pawar

मुंबई :- भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर त्यांची विधानपरिषेदवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधानपरिषेदवर लवकरच राज्यपालनियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे .

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांकडे एकनाथ खडसे यांच्या विधानपरिषदेतील नियुक्तीसाठी शिफारस केली जाईल. एकनाथ खडसे यांच्यासारखा अभ्यासू आणि फर्डा वक्त विधानपरिषेद गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची सभागृहातील बाजू आणखीनच भक्कम होईल.

राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काँग्रेसकडून सत्यजित तांबे, नसीम खान, रजनी पाटील आणि सचिन सावंत यांच्या नावांची शिफारस केली जाऊ शकते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे, उत्तमराव जानकर या नेत्यांना संधी दिली जाऊ शकते.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची तारीखही आता निश्चित झाली आहे. 17 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : तारीख ठरली ; एकनाथ खडसें 17 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत करणार राजकीय घटाची पुनर्स्थापना?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER