एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर? ‘या’ व्हायरल व्हिडिओने पुन्हा चर्चेला उधाण

Sharad Pawar - Eknath Khadse

मुंबई : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पक्षावर  नाराज असून सध्या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. खडसे मुंबईत असल्याने ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. यासाठीच जळगावात खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत वातावरण निर्मिती सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी दुपारनंतर जळगावात खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हॉट्सअॅपच्या अनेक राजकीय ग्रुपमध्ये हा व्हिडिओ टाकण्यात आला.

गतकाळात झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले पक्षाचे गीत या व्हिडिओत टाकण्यात आले असून त्यात खडसेंची प्रसन्न भावमुद्रा असलेला एक फोटोही जोडलेला आहे. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, त्याचीच चर्चा सर्वत्र होत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ कुणी बनवला, कुणी व्हायरल केला, यासंदर्भात  कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER