… तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही- एकनाथ खडसे

Eknath Khadse-NCP

मुंबई : भाजपला (BJP) राम-राम ठोकून  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलॆ . सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं तर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही, असा विश्वासही एकनाथ खडसेंनी व्यक्त केला .

तसेच वाईट प्रवृत्तींशी लढण्याचा हा दिवस असून अपल्यालाही समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढायचे असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. अद्याप मोठे स्वागत बाकी आल्याचे सांगत एकप्रकारे मोठे पद मिळण्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी खडसे यांचं औक्षण करून कार्यालयात स्वागत केलं. आज दसरा आहे. वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाने मात करण्याचा दिवस आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रवेश करतानाच खडसे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. खडसे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, माजी आमदार मनीष जैन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER