नाथा भाऊंच्या जाण्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही – बच्चू कडू

Eknath Khadse-Bachchu Kadu.jpg

अमरावती : जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला.यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. खरं तर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीला एकनाथ खडसे भेटल्यामुळे चांगले दिवस येतील, असं मत बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी व्यक्त केले .

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर उपस्थितांना शरद पवारांनी संबोधित केले. नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी माझ्याशीही चर्चा केली. त्यावेळी त्यांनी एका शब्दांनीही माझ्याकडे कोणत्याही पदाची अपेक्षा व्यक्त केली नाही, असे पवार म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER