राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा साक्षीदार फोडला! भाजप नेत्याचा आरोप

Ram Shinde-Sharad pawar-Eknath Khadse

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी मंत्री प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप आहे .

सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी (Irrigation scam) ईडीची चौकशी सुरू आहे. त्याप्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) विरोधी पक्षनेते असताना ते प्रमुख साक्षीदार होते. आता ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळेच एकनाथ खडसे यांना प्रवेश देत त्यातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केलाय,’ असा घणाघाती आरोप शिंदे यांनी केला आहे. ‘खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर कोणतीही भरतीओहटी येणार नाही,’ असा दावाही त्यांनी केला आहे. ते कर्जत येथे माध्यमांशी बोलत होते.

भाजप ही देशात सर्वात मोठी पार्टी आहे. देशात या पक्षाचा सर्वाधिक स्ट्राइक रेट आहे. भाजपकडे सर्वात जास्त राज्ये आहेत, मुख्यमंत्री आहेत, खासदार आहेत. तसेच काँग्रेस सोडता कोणत्याही पक्षाला देशात बहुमत मिळाले नाही. मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ते भाजपला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीकडे भरती वगैरे काही येणार नाही,’ असा टोलाही शिंदे यांनी लगावला. ‘जयंत पाटीलांनी सांगितले होते, दहा ते बारा आमदार आमच्या संपर्कात आहेत. मग ते आज कुठे गेले?, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.

ही बातमी पण वाचा : नाथाभाऊंवर मोठी जबादारी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी पवारांचे संकेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER