खडसेंचा मुद्दा बिहार निवडणुकीत, भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती

Eknath Khadse

पटणा : ४० वर्ष भाजपासोबत असलेले ओबीसी नेते म्हणून ओळख असणारे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर भाजपाला (BJP) रामराम ठोकला आहे. आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी काळात एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राज्यातील राजकारणात घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी बिहार विधानसभा (Bihar Election)निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या भाजपातून जाण्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.

बिहारमधील काँग्रेसप्रणित महायुती खडसे यांच्या जाण्याने भाजपा ओबीसी विरोधी असल्याचे सांगण्यात येणार आहे. आरजेडीचे राज्यसभेचे खासदार मनोज झा यांनी सांगितले की, मागील ६ वर्षांपासून भाजपाकडून एकनाथ खडसेंचा छळ केला जात होता, कारण ते ओबीसी समाजातील आहेत. खडसे यांनी भाजपाचे बिहार निवडणूक प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. महत्त्वाचे म्हणजे खडसे हे केवळ ओबीसी नेते म्हणून ओळखले जात नव्हते तर ते महाजन-मुंडे गटाचे खंदे समर्थकही होते. महाजन-मुंडे या जोडीने महाराष्ट्रात भाजपाला मोठी ताकद दिली होती असं ते म्हणाले.

एकनाथ खडसेंनी भाजपाला रामराम केल्यानंतर आता बिहारमध्ये विरोधी पक्ष हा मुद्दा जोरदार उचलून धरणार आहे. भाजपामध्ये मागासवर्गीयांचा सन्मान केला जात नाही तर जुन्या नेत्यांचा आदरही राखला जात नाही असा प्रचार भाजपाच्या विरोधात केला जाणार आहे. ज्यांनी भाजपाला कष्ट करून मोठे केले आता पक्ष त्यांना बाजूला ठेवत आहे. या माध्यमातून बिहारमधील जुन्या नेत्यांच्या समर्थकांनाही जवळ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद यांचा समावेश आहे ज्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.

त्यामुळे बिहार निवडणुकीत विरोधकांकडून भाजपाला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली जात आहे. महायुती निवडणूक सभा आणि जनसंपर्कातून भाजपाविरोधी प्रचार करणार आहे. एकनाथ खडसेंची सोडचिठ्ठी असो वा यशवंत सिन्हा, या सर्व गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवल्या जातील असं राजदच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

ही बातमी पण वाचा : जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज दुपारी नाथाभाऊंचा कन्येसह राष्ट्रवादीत प्रवेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER