नाथाभाऊ अजूनही आमचे पालक – चंद्रकांत पाटील

पुणे : राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जळगावच्या दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. या संदर्भात पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीबाबत म्हणाले की, नाथाभाऊ (Eknath Khadse) अजूनही आमचे पालक आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमधून भाजपचा संघर्ष संपणार आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात चंद्रकांत पाटील म्हणाले की, “भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही.

भेटीगाठी वेगवेगळ्या कारणांनी सुरू आहेत. शरद पवार आजारी आहेत, अनेक जण भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत आहेत. देवेंद्र फडणवीस त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले होते. ” ते पुढे म्हणाले की, “एकनाथ खडसेंच्या घरी भेट देण्याचा विषयही असाच आहे. महाराष्ट्रात राजकीय शत्रू जरी असलो तरी भेटायला जायचं ही संस्कृती आहे.

नाथाभाऊ आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच आहेत. त्यांच्या घरात तर भाजपाच्या खासदार आहेत. फडणवीस प्रामुख्याने रक्षाताईंना भेटायला गेले होते. संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. संवाद नसेल तर अडचण असते. पण इथे फडणवीस आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. ”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button