नाथाभाऊ आमचे जुने सहकारी, त्यांना भेटणार – मुख्यमंत्री

औरंगाबाद : आमचा पंगा शेवसेनेसोबत नाही हे शिवसेनेनं नेहमी लक्षात ठेवायला हवं. मात्र, शिवसेनेनं राष्ट्रवादीपासून सावध राहावं, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेना आपली तत्त्व गुंडाळून सत्तेत आली आहे. तत्त्वांशी तडजोड करून सेनेनं हे पाऊल उचललं असलं तरी भाजप त्यांचा शत्रू नाही

. मतदारांनी भाजप-सेना दोघांना मतदान दिल्यानं अधिकाधिक जागा मिळवणं शक्य झालं. हे शिवसेनेनं ध्यानात घेतलं पाहिजे. तसेच, ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक विकासकामांवर स्थगितीचा ठपका लावला जात आहे. मात्र राज्यातील विकासकाम बंद केल्यावर लोक तुम्हाला काय पेढे देणार आहेत का?- असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. नवीन सरकारने विकासकामांच्या योजना बंद करायला सुरुवात केली आहे. जवळपास २०-२५ कामं बंद केली आहेत.

अनेक पाण्याच्या योजनाही बंद केल्या आहेत. सुरू केलेल्या योजना ह्या भाजपच्या भल्याच्या नव्हत्या तर त्या राज्याच्या भल्याच्या होत्या, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे. मराठा आणि कुणबी युवकांसाठी सुरू केलेल्या ‘सारथी’ योजनेवरदेखील सरकारने अनेक निर्बंध घातले. आतापर्यंत ५०० जणांना या योजनेचा फायदा झाला आहे. अशानं सरकार राज्याच्या हिताचं काम करत नाही, असाही आरोप पाटील यांनी केला.

उद्धव ठाकरेंकडून एकनाथ खडसेंना आद्यपही भेटीची वेळ मिळाली नाही