एकनाथ खडसेंची ईडीकडून (ED) साडेसहा तास चौकशी

ED - Eknath Khadse

मुंबई : पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी (bhosari land Probe) प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येची आज ईडीकडून (ED) सुमारे साडेसहा तास चौकशी करण्यात आली. ईडीला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा त्यांना सर्व सहकार्य करेन, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. (eknath khadse Grilled By ED For 6 Hours In bhosari land Probe) खडसे त्यांच्या कन्येसोबत आज सकाळी ईडीच्या कार्यालयात गेले.

त्यांची साडेसहा तास कसून चौकशी करण्यात आली. संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारे खडसे ईडी कार्यालयातून बाहेर पडले. माध्यमांशी बोलताना ते म्हणालेत की, ईडी मला जेव्हा जेव्हा कागदपत्रं आणि इतर माहितीसाठी बोलावेल तेव्हा मी हजर राहीन. ईडीला सर्व सहकार्य करणार आहे. मात्र, आजच्या चौकशीत विचारलेल्या प्रश्नांची माहिती  देणे त्यांनी टाळले.

दबाव नाही
ईडीने नोटीस बजावली होती. त्यामुळे मी हजर राहिलो. यापूर्वी भोसरी जमीन प्रकरणी चार वेळा चौकशी झाली आहे. आता ईडीकडून पाचव्यांदा चौकशी केली जात आहे. अँटिकरप्शन ब्युरो, आयकर विभाग आणि झोटिंग कमिटीने सखोल चौकशी केली आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. चौकशीमुळे माझ्यावर कोणताही दबाव आलेला नाही. त्यांनी पुन्हा बोलावले नाही, असे खडसे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER