राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

Eknath Khadse

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच दाखल झालेले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाला आहे. ते उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहनही एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

याबाबतचे ट्विट करत एकनाथ खडसेंनी ही माहिती दिली. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे अ‌ॅक्शन मोडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. त्या भेटीतूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER