भाजप खासदार असलेल्या सूनबाईंनी केले राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचे स्वागत

Raksha Khadse-Eknath Khadse

मुंबई : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) काल जळगावात पोहचले. यावेळी भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी नाथाभाऊंचं औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केलं. रक्षा खडसे या नाथाभाऊंच्या स्नुषा असल्या तरी त्या भाजपच्या खासदार आहेत. पक्ष बदलल्यानंतर खडसे गावी परतल्यानंतर त्यांचं रक्षा खडसे यांनी स्वागत केल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यासह मूळगावी कोथळीत पोहचले. यावेळी त्यांचं ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच ‘नाथाभाऊ जिंदाबाद’च्या घोषणाही दिल्या.

ही बातमी पण वाचा : … तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही- एकनाथ खडसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER