एकनाथ खडसेंच्या पुढाकाराने राष्ट्रवादीची ‘महाभरती’ ; भाजप कार्यकर्त्यांनी मनगटावर बांधले घड्याळ

Eknath khadse.jpg

मुंबई : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभरतीला सुरुवात झाली आहे .काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेरमधील भाजप कार्यकर्त्यांची फौज गळाला लावली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा चाळीसगाव मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होताना दिसले.

‘जिकडे खडसे तिकडे आम्ही’ असा नारा देत भाजपच्या या कार्यकर्त्यांनी मनगटावर घड्याळ बांधले. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जवळपास १०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या  अध्यक्ष रोहिणी खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भय्या पाटील, निवृत्ती पाटील हेदेखील उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER