
नाशिक : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. आता त्यांना कोरोनाचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना आता १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवल्याने खडसे यांनी कोरोना (Corona) चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतचे वृत्त झी-२४ तास या वृत्तवाहिनीने दिले आहे.
या कोरोनाच्या चाचणीचा अहवाल काल रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यात समोर आले आहे. या घटनेला खडसे परिवाराकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. तसे त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्याने खडसे यांनी ईडी चौकशीसाठी जाणे टाळले होते. त्यांनी मुदत मागितली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला