एकनाथ खडसेंना दिलासा : अटक करणार नाही; ईडीने उच्च न्यायालयात दिली हमी

eknath khadse & ED

मुंबई :  ईडीच्या  (सक्तवसुली संचालनालय) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना येत्या सोमवारपर्यंत अटक करणार नाही, अशी हमी ईडीने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दिली. फडणवीस सरकारच्या काळात पुण्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीमुळे  खडसे वादात सापडले आहेत.

त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी होऊन त्यांना ‘क्लीन चिट’ही देण्यात आली होती. या व्यवहारासह अन्य काही प्रकरणांत ईडीकडून खडसे यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

त्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. ईडीने कठोर कारवाई करू नये म्हणून खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर ईडीने प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यांच्या याचिकेला उत्तर दिले. सोमवारपर्यंत अटक न करण्याची हमी दिली. प्रकरणाची न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER