राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मी आता टेंशन फ्री : एकनाथ खडसे

Eknath Khadse

मुंबई :- राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केल्याने माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. त्यामुळे आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी सुरू करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिला. कधी माझ्यामागे ईडी लागेल, कधी अँटी करप्शन लागेल, याची नेहमी भीती असायची, असेही खडसेंनी यावेळी सांगितले.

मागच्या कालखंडात गेले चार वर्षे मी भीतीच्या छायेखाली वावरत होतो. कधी विनयभंगासारखी केस दाखल केली जाईल, याची नेहमी भीती असायची. मात्र आता मी त्या केसमधून निर्दोष सुटलो आहे. विनयभंगासारख्या खटल्यातूनही बाहेर आलो आहे. या सर्वातून बाहेर आल्याने माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. आता एनसीपीत आलो. त्यामुळे आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी सुरू करणार आहे, असा इशारा एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER