तूर्तास तरी राज्यात मध्यावधी निवडणुका होईल असं वाटत नाही : एकनाथ खडसे

Eknah Khadse

नवी मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर हे सरकार कधी पडेल याचीच चिंता विरोधकांनी अनेकदा व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारविषयी बोलताना तूर्तास तरी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं वाटत नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून १५ आणि १६ फेब्रुवारीला नवी मुंबईत अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनात खडसे बोलत होते. एकनाथ खडसे म्हणाले, “महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर मतांतरं आहेत.

आता ही मतांतरं उघडपणे होत असून वाढायला लागली आहेत. अशा अंतर्गत विरोधामुळेच हे सरकार मोडेल. असं असलं तरी मध्यावधी निवडणुका तूर्त होतील असं मला वाटत नाही. त्यांनाही काही काळ द्यावा लागेल. त्याचप्रमाणे मी माझ्या पक्षावर टीका केल्याचा माझ्यावर आरोप होतो; मात्र, मी माझ्या पक्षावर कधीही टीका केली नाही. माझी टीका एखाद्या वेळी व्यक्तीवर असू शकते. परंतु पक्षावर मी कधी टीका करत नाही, असेही खडसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

व्हॅलेंटाईन डे निमित्त अमृता फडणवीस यांनी गायले इंग्रजी गाणे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील मध्यावधी निवडणुकांवर भाष्य केलं होतं. त्यांनी भाजप महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची तयारी करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचं मध्यावर्ती निवडणुकांवरील हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.