विरोधी पक्षाने ज्या पद्धतीने काम केले पाहिजे, तसे सध्या उत्तम चालले आहे – एकनाथ खडसे

Eknath Khadse-Devendra Fadnavis

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कामाती स्तुती केली आहे. एरवी फडणवीसांवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधणारे खडसे यांनी चक्क त्यांचे कौतुक केले आहे. विरोधी पक्षाने ज्या पद्धतीने काम केले पाहिजे, तसे सध्या विरोधी पक्षाकडून केले जात असल्याचे उद्गार एकनाथ खडसे यांनी काढले आहेत.

मी विरोधी पक्षनेता असतानाही याच पद्धतीने काम करीत होतो, हे सांगायलादेखील खडसे विसरले नाहीत. राज्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेली कर्जमाफी कशी फसवी आहे, कॉंग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा झालेला अवमान, महिलांवरील वाढते अत्याचार, हिंगणघाटमधील घटना अशा मुद्द्यांवर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांचे कौतुक केले आहे.

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्व काही आलबेल नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. गोपीनाथ गडावर डिसेंबरमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सर्वांसमोर पक्षात आपली घुसमट होत असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुस्लिम आरक्षणावरून महाआघाडीत विसंवाद असल्याचे उघड