एकनाथ खडसे शिवसेनेवर नाराज; म्हणाले, शिवसेनेकडून दिशाभूल !

Shiv Sena - CM Uddhav Thackeray - Eknath Shinde - Eknath Khadse

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं (Shiv Sena) पुन्हा एकदा भाजपला (BJP) जोरदार धक्का दिला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज भाजपच्या ६ नगरसेवकांच्या मनगटावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला. तसेच उद्या ४ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री आणि नेते गुलाबराव पाटील यांनी दिली. तब्बल १० नगरसेवक शिवसेनेत जाण्याचे पक्के झाल्याने हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिवसेनेवरच नाराजी व्यक्त केली आहे.

‘मुक्ताईनगरमधील भाजपाचे १० नगरसेवक शिवसेनेत गेल्याची बातमी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. अपात्रच्या भीतीपोटी पाच अपक्ष नगरसेवक शिवसेनेत गेल्याचं दिसून येत आहे. बाकीचे नगरसेवक माझे समर्थक आहेत. त्यामुळे नगर परिषदेवर कुठलाही परिणाम याचा होणार नाही, अशी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button