आतापर्यंत क्लिन चिट मिळणा-या खडसेंच काय होणार! ; आज ईडी कडून चौकशी

Eknath Khadse

मुंबई : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने (BJP) ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिला होता.

त्याच खडसेंना गेल्या महिन्यात 30 डिसेंबरला ‘ईडी’कडून एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. आज ते ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खडसेंची ईडीची चौकशी लांबणीवर पडली होती. अखेर क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर आज एकनाथ खडसे ‘ईडी’समोर हजर होतील.

पुण्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये खडसे यांची चौकशी होणार आहे.

आतापर्यंतच्या चौकशीत एकनाथ खडसेंना क्लीन चिट

खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे खरेदी केलेल्या जमिनीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद सोडावे लागले होते. नंतरच्या काळात एकनाथ खडसे हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे गेले होते. मात्र, या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती.

मात्र, राष्ट्रवादीत जातानाच ईडी लावली तर मी सीडी लावेन म्हणण-या खडसेंचे काय होणार, चौकशीत काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER