ऐन निवडणुकांच्या तोंडावर खडसेंचा करिष्मा, भाजपच्या 18 नगरसेवकांसह कुटुंबीय राष्ट्रवादीत

जळगाव : भाजपला रामरामठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंची (Eknath Khadse) जादू आता जळगावात चालू लागली आहे. आता त्यांच्या समर्थकांनी ‘भाजप’ला (BJP) सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(NCP) प्रवेश करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी हा पहिला मोठा धक्का मानला जात आहे. भाजपला सोडचिठ्ठी देताच खडसेंनी आता आपली पॉवर दाखवण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळमधील 18 विद्यमान नगरसेवक (18 BJP Corporators) आणि 13 माजी नगरसेवक व कुटुंबियांनी जळगाव इथं राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हा प्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे नेते आणि समर्थक उपस्थित होते.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत एकूण 53 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपमधून जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ. भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे आणि अनेक माजी नगसेवक व आजी माजी नगरसेवकांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER