एकनाथ खडसेंची प्रवेशावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची चुप्पी

Eknath Khadse - NCP

मुंबई : भाजप (BJP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादीच्या (NCP) वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . सध्या तरी खडसेंचा संभाव्य पक्षांतराचा मुहूर्त टळला असला तरी ते पक्षांतर नक्की करतील, अशी माहिती समोर येत आहे . खडसे घटस्थापनेच्या दिवशी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र तसे झाले नाही . खडसे यांच्या प्रवेशावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चुप्पी साधली आहे . तसेच एकनाथ खडसेही मौन बाळगून आहेत.

खडसे बाबत नेहमी आपले मत परखडपणे व्यक्त करतात, खडसेंना राष्ट्रवादीबाबत विचारले असता त्यांनी चुप्पी साधल्याने कार्यकर्त्यांसह अनेकजण संभ्रमात आहेत.

जळगावात शुक्रवारी खडसेंनी “राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही, नो कमेंट्स” असे उत्तर देत या विषयाचे खंडन केले. “माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत”, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना ठाकरे सरकारमध्ये थेट कृषिमंत्री देण्यात येणार असल्याच्या चर्चा असल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER