‘८०वा वाढदिवस ८० लाखांचा निधी!’ शरद पवार शेतकऱ्यांना गिफ्ट देणार

Sharad Pawar

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुप्रीमो शरद पवार वयाच्या ८०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. येत्या १२ डिसेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. या वर्षी त्यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादीच्यावतीने बळीराजा कृतज्ञतादिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शरद पवार हे ८० व्या वर्षात पदार्पण करत असल्याने ८० लाखांचा बळीराजा कृतज्ञता निधी तयार करून तो शेतक-यांना देण्यात येणार आहे.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान मोदींची कोंडी करण्यासाठी पवारांची रणनीती तयार

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शहरांमध्ये उपक्रम राबले जाणार आहे. तसेच, ‘परिवर्तनाचा महानेता’ या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजनही करण्यात येणार आहे.

‘उन्होंने मेरी सूरत बदली, मेरा मन नहीं’ मन हेलावून टाकणारा छपाक चा ट्रेलर

शरद पवार हे वाढदिवसानिमित्त फक्त शुभेच्छा स्वीकारणार आहेत. ते पुष्पगुच्छ, पुष्पहार स्वीकारणार नाहीत. तो निधी कृतज्ञता कोषात जमा केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबला जाणार आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांना माझ्या जातीबद्दल बोलावं लागतं यातच माझं यश: देवेंद्र फडणवीस

प्रस्तुत कोष राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून अडचणीतील शेतक-यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकारपरिषदेत दिली.

त्याचप्रमाणे, युवक राष्ट्रवादी विकासतर्फे संपूर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे. तर मुंबई युवकच्यावतीने ११ ते २० डिसेंबरपर्यंत सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.