“आठवीचा विद्यार्थीही सांगेल सरकार हे प्रकरण दाबतंय”; चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला टोला

Chandrakant Patil & Uddhav Thackeray

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांवर हायकोर्टाचे आज निकाल दिला. देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. यामुळे ठाकरे सरकारला (Thackeray Goverment) जोरदार झटका बसला आहे. भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही कोर्टाने दिलेल्या निर्णायवर भाष्य करत राज्य सरकारवर टीका केली.

“परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे इतके स्पष्ट आहेत आणि माध्यमांमध्येही त्याबाबत इतक्यांदा स्पष्टीकरण देऊन झाले आहे की आठवीतील विद्यार्थी देखील सांगेल, की सरकार हे प्रकरण दाबतंय. आता कोर्टानेच सीबीआय चौकशीची निर्णय दिला आहे. तर अनिल देशमुखांनी राजीनामा द्यायला हवा. महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या मंत्र्यावर सीबीआय चौकशीचे आदेश असतानाही राजीनामा घेण्यात आलेला नाही, तर हा अनोखा प्रकार ठरेल.” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

पवारांवर विश्वास; देशमुखांचा राजीनामा घेतील

“शरद पवार साहेबांचा राजकारणातील अनुभव पाहता एखाद्या मंत्र्यावर सीबीआय चौकशीचे आदेश असताना ते राजीनामा घेतील, असा विश्वास आम्हाला आहे. असे त्यांनी केले नाही, तर महाराष्ट्राची जनता सारंकाही पाहत आहे. आता कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरू शकत नाही.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button