आता मंत्रालयातही कोरोनाचा शिरकाव, आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

Mantralaya - Coronavirus

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या (Corona) संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. सर्वसामान्यांना कोरोनाची लागण होत आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने मंत्रालयालाही आपल्या कवेत घेतले आहे. मंत्रालयाच्या महसूल विभागातील आठ कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकाच विभागातील इतके कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तसेच महसूल विभागात सॅनिटायझेशनही करण्यात येणार आहे.

मंत्रालयातील हे कर्मचारी कोण आहेत, त्यांचा गेल्या दोन दिवसात काही संपर्क आला का? याबाबत शंका उपस्थितीत केली जात आहे. मात्र मंत्रालयात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केल्याने धाकधूक वाढू लागली आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी मार्च महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याच्या भाऊ आणि वहिनीला कोरोनाची लागण झाली होती. त्या दोघांनाही खोकला आणि ताप होता. त्यामुळे ते दोघेही कोरोनाची चाचणी करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाले होते. या दोघांची चाचणी घेतल्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. विशेष म्हणजे हे दोघेही काही दिवसांपूर्वी अमेरिकेला जाऊन आले होते. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचा भाऊ मंत्रालयात काम करतो. तो आणि त्याचा भाऊ एकाच इमारतीत राहतात. तसेच ते दोघेही सतत एकमेकांना भेटतात. त्यामुळे आता मंत्रालयातील तो कर्मचारी कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी दाखल झाला आहे.

मुंबईची सद्यस्थिती काय?

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत आहे. मुंबईत काल 921 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 19 हजार 128 झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईत एकूण 5859 ॲक्टिव्ह रुग्ण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER