टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेत भारताचे आठ पहिलवान

Tokyo Olympic

भारताची सीमा बिस्ला (Seema Bisla) ही 50 किलोगटात टोकियो ऑलिम्पिकसाठी (Olympic) पात्र ठरली आहे. बल्गेरियातील सोफिया (Sofia, Bulgaria) येथे या वजनगटाची अंतिम फेरी गाठून तिने ही पात्रता मिळवली आहे. आता सीमासह आठ भारतीय पहिलवान (Wrestling) टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. त्यात चार पुरुष व चार महिला आहेत.,

सीमा बिस्लाने ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोलंडच्या अॕना लुकासियाकला मात दिली. याच स्पर्धेत गुरुवारी पुरुषांमध्ये सुमीत मलिक हा 125 किलोगटात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. मात्र नंतर तो गुडघादुखीमुळे अंतिम लढतीसाठी आखाड्यात उतरला नव्हता.

आशियाई स्पर्धेची कास्यपदक विजेती राहिलेली सीमा हिने आधीच्या लढतींमध्ये बेलारुसची अॕनास्तेशिया यानोतावा हिला 8-0 आणि 2018 च्या युवा ऑलिम्पिकची विजेती एम्मा योना मामग्रेन (स्वीडन) हिला 10-2 अशी मात दिली होती.

सीमाच्या सहकारी निशा दहिया (68 किलोगट) ही उपांत्यपूर्व फेरीत तर पूजा (76 किलोगट) ही पहिल्या फेरीत पराभूत झाली.

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय पहिलवान

महिला
सीमा बिस्ला (50 किलोगट)
विनेश फोगाट (53 किलोगट)
अंशू मलिक (57 किलोगट)
सोनम मलिक (62 किलोगट)

पुरुष
रवीकुमार दहिया (57 किलोगट)
बजरंग पुनिया (65 किलोगट)
दीपक पुनिया (86 किलोगट)
सुमीत मलिक (125 किलोगट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button