राज्यात आठ एक्स्प्रेस रेल्वे सुरू होणार

special trains running through Nanded region

सांगली : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस व कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेससह आठ एक्स्प्रेस सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये कोरोना आणि महाराष्ट्र या दोन एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (दि.12) पासून सकाळी नियमीत वेळेत मुंबई येथून सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी कोल्हापूर येथे पोहोचेल. तर कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस (दि. 13) पासून दररोज सकाळी कोल्हापूर येथून सुटेल. त्याच दिवशी ती मुंबई येथे पोहोचेल. या विशेष गाडीला कर्जत, खंडाळा, घोरपडी, तारगाव, वळीवडे वगळता इतर सर्व स्थानकांवर थांबणार आहे.

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर येथून (दि. 11) पासून दररोज सकाळी नियमीत वेळेत सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी गोंदिया येथे पोहोचेल. तर गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस (दि. 12) पासून गोंदिया येथून दररोज नियमीत वेळेत सुटेल ती दुसऱ्या दिवशी कोल्हापूर येथे पोहोचेल. या विशेष गाडीला सेवाग्राम, चांदूर, जलंब, पुणतांबा, जरंडेश्वर, तारगाव, मसूर, भवानी नगर, ताकरी आणि वळिवडे वगळता इतर सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER