औरंगाबाद : झन्ना मन्ना जुगार खेळणारे आठ जण गजाआड

औरंगाबाद : पत्त्यांवर पैसे लावून झन्ना मन्ना नवाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी छापा टाकुन गजाआड केले. ही कारवाई १३ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्यासुमारास पंढरपुरातील टोयोटा शोरुमच्या मागील शेतात करण्यात आली. जुगाऱ्यांकडून १० हजार ६८० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. प्रकरणात उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत सचिन गोरखनाथ जमधडे, सचिन भिवा परभणे, नितीन रामेश्वर सुलताने, आकाश देविदास तोडकर, दिलीप भीमराव खंदारे, धोंडीराम विश्वनाथ जाधव, सुनिल भिकाजी खोतकर व एक महिला अशा आठ जणांवर एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बांगर करत आहेत.

औरंगाबाद : नायलॉनच्या मांज्यांची विक्री,तिघांवर गुन्हा