बोहरा समाजाची ईद साजरी

Bohra Community - Eid

औरंगाबाद : मिश्री कॅलेंडरनूसार बोहरा समाजामध्ये रमजान ईद साजरी करण्यात येत असते. शनिवारी (२३ मे) बोहरा समाजाच्या समाज बांधवानी आपल्या घरीच ईद उल फित्रची नमाज अदा केली. घरातील सदस्यांना शुभेच्छा देऊन ईदचा सण साजरा केला.

रमजान महिन्यात बोहरा समाजाच्या शहरातील सैफी आणि नजमी मशीद येथे पहाटे नमाज अदा करून विविध धार्मिक कार्यक्रमानंतर ईदचा सण सामुहिक रित्या साजरा करण्याची परंपरा आहे. यंदा करोना विषाणूचा प्रसार होत असल्याने, धार्मिक कार्यक्रम रद करण्यात आले. यामुळे रमजान महिन्यात बोहरा समाजाच्या लोकांनी लॉक डाऊनच्या काळात आपल्या घरीच राहून नमाज अदा केली. बोहरा समाजाचे प्रमुख सैयदना मुफददल यांचा संदेश ऑनलाईन ऐकत होते. तसेच आॅनलाईन सर्व रितीरिवाज घरी राहुनच अदा करण्यात येत होते.

रमजान ईदच्या दिवशीही बोहरी समाजाच्या अनेक बांधवांनी आपल्या घरी पहाटेची फजरची नमाज अदा करून ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. घरात आपल्या परिवाराच्या सदस्यांसोबत ही नमाज अदा करण्यात आली. यावेळी करोना संकटातून देशाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी अल्लाहकडे दुआ मागण्यात आली.

लॉक डाऊन आणि सामाजिक सुरक्षीतता वावर नियम असल्याने, अनेकांनी सलाम करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वकियांशिवाय अन्य लोकांची गळाभेट टाळून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती अजुमन ए सैफी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अज्जु पेटीवाला यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER